जनतेज न्युज

काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात थाली बजाव आंदोलन

प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौक परिसरामध्ये आज काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्या महिलांनी गॅस आणून त्यावर बांगड्या ठेवून हे आंदोलन केले. काँग्रेसचे सरकार असताना मनमोहन सिंग यांना बांगड्या देण्यात आल्या होत्या, तेव्हा चारशे रुपये गॅस होता आज गॅस 1200 रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याच बांगड्या परत आम्ही त्यांना देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळामध्ये थाळी वाजून कोरोना महामारी ला पळवून लावले होते. तसेच आम्ही आज थाळी वाजून या महागाईला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष दिपाली मिसाळ यांनी दिली आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.