जनतेज न्युज

लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; अश्रूपूर्ण नयनांनी मुर्धोनित दिला अखेरचा निरोप

प्रतिनिधी , यवतमाळ : वणी तालुक्यातील रहिवासी असलेले लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे अरुणाचल प्रदेशच्या भारत चीन सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मूळ गावी मुर्धोनी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी मूळ गाव असलेले मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्काराला आर्मीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व लोकप्रतिनिधी सह वनी परिसरातील व गावातील हजारोंचा जनसागर उपस्थित होता. भावपूर्ण व शोकाकुल वातावरणात झालेल्या संस्काराच्या वेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. लेफ्टनंट कर्नल वासुदेव यांचे पार्थिव मुर्धोनी येथे आले. यावेळी. त्यांच्या राहते घरून अंत्ययात्रा निघाली. वंदे मातरम, भारत माता की जय, आवारी साहेब अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. घराघरातून पार्थिवावर फुलाचा वर्षाव श्रद्धांजली वाहन्यात आली. सुरुवातीला लष्कराच्या जवानांनी लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना सलामी दिली. नंतर पोलीस विभागामार्फत 21 तोफांची सलामी देत मानवंदना देण्यात आली.