जनतेज न्युज

माघी पौर्णिमेनिमीत्त भरवण्यात येणाऱ्या मलंगगड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : माघी पौर्णिमेनिमीत्त भरवण्यात येणाऱ्या मलंगगड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते गडावर मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीसमोर महाआरती करण्यात आली. ही यात्रा गेली अनेक वर्ष सुरू असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनेक वर्ष सुरू आहे. दिघे यांचे स्वर्गारोहण झाल्यानंतर शिवसेनेत पालकमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या यात्रेचे आयोजन केले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते प्रथमच या गडावर महाआरती करण्यात आली.