प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील श्रीकांत कंचलवार व त्यांचे बंधू व्यंकटेश कंचलवार यांच्यावर जमिनीच्या वादातून जीव घेणे हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये श्रीकांत कंचलवार यांचा मृत्यू झाला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज आर्य वैश्य समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. व किनवट येथील पोलीस निरीक्षक हे तपास व्यवस्थित करत नसल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी देखील मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यापूर्वी देखील आमच्या समाजावर बरेचसे हल्ले झाले आहेत. त्या गोष्टीचा आम्ही निषेध देखील करत आहोत व सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आज किनवट शहरातील व्यापारी बंधूंनी आपले प्रतिष्ठाने देखील बंद ठेवली आहेत.
