प्रतिनिधी, नाशिक : काही दिवसांपूर्वी मालेगावातून हत्येचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेत एका महिलेचा निर्घृण खून करून अक्षरशः तिच्या शरीराचे तुकडे करून तिला माती आणि दगडाच्या ढिगाऱ्या खाली पुरल्याचे समोर आले आहे.दागिने लुटीसाठी त्याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.किरण ओंकार गोलाईत असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दहीदी गावा जवळ भागात सुमनबाई भास्कर बिचुकले ही महिला सकाळी शेतात काम करत होती.तर तिचे पती हे शेतीमालाच्या विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते.सायंकाळी ते घरी परतल्यावर त्यांना घरी पत्नी दिसून आली नाही,त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरु केली. ते आधी पत्नीला शोधत त्यांच्या शेतात गेले.मात्र त्या मिळून आल्या नाही. म्हणून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले आणि सगळ्यांनी मिळून शोध सुरु केला. शोध करत असताना शेतात रक्ताने माखलेले फावडे त्यांना आढळून आले. त्यानंतर शेतापासून जवळपास एक किलो मीटर अंतरावर असलेल्या जंगलात त्यांना महिलेचे शीर,धड आणि पाय असे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.तर या घटनेने परिसारत एकच खळबळ उडाली.अतिशय क्रूरपणे या महिलेची हत्या करण्यात आली होती.या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.खून नेमका कोणी आणि का केला,या बद्दल काहीच अंदाज नव्हता.पोलिसांनी या घटनेचा अतिशय शिताफीने छडा लावत घटनेतील संशयित आरोपीला बेड्या ठोकत दागिन्यांसाठी त्याने क्रूरपणे सदर महिलेची हत्या केली असल्याचे उघड झाले. संशयित आरोपीने महिलेला शेतात एकटी असल्याचे पहिले सोबतच तिच्या अंगावर त्याला चांदीचे दागिने दिसले. हे दागिने पाहून त्याने महिलेला फरफटत जंगलात नेले.त्यांनतर संशयिताने महिलेच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला व तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले एवढ्यावर न थांबता त्याने तिच्या पायावर फावड्याने वार करत पाय तोडून पायातील चांदीचे दागिने काढन्याचा प्रयत्न केला ते निघत नसल्याने संशयिताने महिलेचे प्रेत १ किलोमीटर पर्यंत गाडीवर टाकून नेले त्यानंतर वनजमिनीतल्या एका तलावात हे प्रेत टाकून देत तो ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजगव्हान गावात जाऊन त्याने एक कोयता खरेदी केला आणि परत घटनास्थळी येऊन त्याने मयत महिलेचे पाय कापला आणि तिच्या पायातले वाळे काढून तिचे प्रेत त्याच ठिकाणी माती आणि दगडाच्या सहायाने पुरून टाकले व तोडलेला पाय झुडपात टाकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले.या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली आहे….
