जनतेज न्युज

मनपा शिक्षण विभाग आयोजित विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

औरंगाबाद,महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शाळांसाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शन शिशु विकास मंदिर माध्यमिक विद्यालय श्रेय नगर येथे घेण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये पाचवी ते आठवी व नववी ते बारावी असे दोन गट होते दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 30 शाळेच्या संघानी सहभाग नोंदवला.विज्ञान प्रदर्शनासाठी माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता ,
वाहतूक व नव उपक्रम, पर्यावरणीय चिंता, आमच्यासाठी गणित,हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षण अधिकारी संजीव सोनार, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे ,भारत तीनगोटे ,समग्र शिक्षा अभियानाचे ज्ञानदेव सांगळे, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी जे. व्ही.चौरे व दिलीप शिरसाट,ज्येष्ठ अधिव्याख्याता माधुरी दलाल तसेच शिशु विकास शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अनिता कुलकर्णी, माधवी जंगले ,संध्या मेश्राम, व सर्व शिक्षक वृंदांनी केले होते.या स्पर्धेमध्ये सहावी ते आठवी गटामध्ये प्रथम क्रमांक औरा इंटरनॅशनल शाळेच्या अडथळा आल्यास आपोआप मार्ग बदलणारी कार या प्रयोगास मिळाले हा प्रयोग पूर्वा सोनवणे या विद्यार्थिनीने केला होता. द्वितीय पारितोषिक शिशु विकास विद्यामंदिर या शाळेच्या तन्मय जामकर याने सादर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रयोगास मिळाले,तृतीय पारितोषिक अलमीर उर्दू प्राथमिक शाळेच्या मिर्झा अनास या विद्यार्थ्यांनी मॅजिकल टॉईज या प्रयोगास मिळाले. नववी ते बारावी ग्रुप मध्ये कै. सौ कलावती चव्हाण विद्यालयाच्या वैष्णवी राऊत आणि मानसी जोशी या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रोड एक्सीडेंट प्रेवेंशन या प्रयोगास तर द्वितीय पारितोषिक शारदा मंदिर विद्यालयाच्या प्रणोती येळीकर या विद्यार्थिनीने मल्टी परबज ब्रश तर तृतीय पारितोषिक सरस्वती भुवन विद्यालयाच्या शिवराज रायते व हितेश बोरा या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सोलार इलेक्ट्रिक कार या प्रयोगास मिळाले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आर पी नाथ शाळेच्या अरविंद भारती या विद्यार्थ्याने कार्बाईड तोफ या उपक्रमास प्रथम पारितोषिक मिळाले. या प्रदर्शनामध्ये परीक्षक लक्ष्मण महाजन ,राजेंद्र शेळके, बाळासाहेब चोपडे हे होते.