प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद,दिनांक 02/01/2023 पासुन औरंगाबाद पोलीस ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया हे स्वत: संपुर्ण प्रक्रिया पुर्ण होईपर्यत भरती मैदानी उपस्थित राहुन उमेदवारांना समस्या उद्भवल्यास त्याचे जातीने निराकरण करत आहे. मा. पोलीस अधीक्षक यांनी संपुर्ण भरती प्रक्रिया ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुर्ण करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवार यांचे नोंदणी ही त्यांचे बायोमेट्रिक स्कॅन करून करण्यात येत असुन उमेदवार यांचे चेस्ट क्रमांकावर बारकोड क्रमांक देण्यात येत आहे. याच प्रमाणे संपुर्ण प्रक्रियेमध्ये RFID [ Radio-frequency identification] प्रणालीचा वापर करण्यात येत असुन ज्याचे साहय्याने उमेदवारांचे 100 मीटर व 1600 मीटरचा अचुक वेळ नोदविण्यात येवुन वेळनुसार अचुक गुणांकन केले जात असल्याने उमेदवारांचे क्षमतेप्रमाणे त्यास अचुक गुणप्राप्त होत आहेत. ज्यामुळे उमेदवारांना प्राप्त गुणांकामध्ये आक्षेप निर्माण होत नाही. पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण येथे पोलीस शिपाई यांची एकुण 39 पदे असुन या करिता 5727 उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केली आहेत. आज 1800 उमेदवार यांना चाचणी करिता बोलवण्यात आले होते.
