प्रतिनिधी, नागपुर : अद्वेत याचा हट्ट होता की राज ठाकरे यांना भेटल्या शिवाय आज जेवणार नाही. अद्वेत आणि त्याची आजी सकाळ पासूनच हॉटेल मध्ये येऊन थांबले होते.राज ठाकरे हॉटेलला आल्यावर आजीने ही गोष्ट मनसे कार्यकर्त्यांना सांगितली की अद्वेत असा हट्ट करून बसला आहे त्यानंतर कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली तर ठाकरे यांनी मुलासाठी निरोप पाठविला की अद्वेत जेवल्या शिवाय राज ठाकरे त्याला भेटणार नाही. अद्वेत याने त्याच हॅाटेलमध्ये जेवण केले आणि त्यानंतर राज ठाकरे हे अद्वेत ला भेटुन त्याला ऑटोग्राफ दिला.
