प्रतिनिधी , वाशिम: वाशिम शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने हे खड्डे त्वरित बुजवण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याकरिता रस्त्यावर श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले,यावेळी मनसे जिल्हाअध्यक्ष सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
