जनतेज न्युज

मंत्री दादा भुसे यांनी पिस्तुल घेऊन दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरास पकडले

दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडली असून पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील 3महिलांचा जीव वाचला आहे.चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. आज लक्ष्मी पूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिला मध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे आलेले होते त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. दोन तासा नंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसाच्या हवाली केले.