प्रतिनिधी, चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या दिवाळीनिमित्त गरीब घटकातील स्वस्त धान्य दुकान कार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ नामक एका उपयुक्त किटचे वाटप करण्याचे ठरविले आहे.चंद्रपूर शहरात मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आल्या.शिधा घेण्यासाठी लाभार्थ्यांना लागणारे शंभर रुपये मुनगटीवार यांनी दिले.याबदल्यात माझ्या नातनीला आशीर्वाद द्यावा अशी भावनिक हाक त्यांनी दिली. जील्हतील ७५ टक्के लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आल्या आहेत.शासनाच्या या उपक्रमामुळे गरीब लाभार्थ्यांची दिवाळी काही प्रमाणात आनदात जाणार.
