प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अपमान संसदेत मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. त्याच्या निषेधार्थ आज भाजप च्य धंतोली भागातील विभागीय कार्यालयाबाहेर नागपुर शहर महिला काँग्रेस आंदोलन करणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली पंचशील चौकातून भाजप कार्यालयाकडे जाताना महिला काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन करत भाजप को सद्बुद्धी दे भगवान अश्या पद्धतीच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. अधिरंजन चौधरी यांनी झालेल्या प्रकरणाची माफी मागितली पण भाजप नेते स्वस्थ प्रसिध्दी साठी अश्या पद्धतीची चिखलफेक करत असल्याचा आरोप शहर महिला काँग्रेस अध्यक्ष नैश अली यांनी केली.
