प्रतिनिधी, सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर तोडगा निघाला आहे. दोन्ही शिवसेना गटांनी एकाच स्वागत कमानीवर दावा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने दोन्ही गटाच्या नेत्यांची सामंजस्याची भूमिका घेतली. मिरज मध्ये ठाकरे गटाची स्वागत कमान, स्वागत स्टेज तर शिंदे गटाचा फ्लेक्स आणि स्वागत स्टेज उभा राहणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या साठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज नगरीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक स्वरूपाचे असून अनेक राज्यातून येणारे गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी होत असतात. विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत मिरजेत स्वागत कमानी उभारण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. धार्मिक पौराणिक ऐतिहासिक अशा विविध विषयावरील स्वागत प्रमाणे विविध पक्षाने संघटनांच्या कडून उभा केले जातात. मात्र यंदा शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेनेच्या गटातील नेत्यांनी स्वागत कमानीच्या परवानगी साठी अर्ज केला. दोन्ही गटांनी एकाच जागेवर दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाच्या परवानग्या नाकारल्या.मात्र सार्वजनिक उत्सव आणि कायदेशीर बाबी यांची सांगड घालत व्यावहारिकपणे पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तोडगा काढला. मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, डी एस बीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरजेचे तहसीलदार डी एस कुंभार आणि अतिरिक्त आयुक्त संजीव होवाळ यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्या बरोबर बैठक घेऊन योग्य तोडगा काढला. त्यामुळे स्वागत कमानी बाबतचा वाद मिटला. मिरज मध्ये ठाकरे गटाची स्वागत कमान आणि स्टेज तर शिंदे गटाचा फ्लेक्स आणि स्वागत स्टेज उभा राहणार आहे.
