जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत- मंत्री गिरीश महाजन

प्रतिनिधी , नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. स्मृती मंदिर मध्ये आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली करण्यासाठी मंत्री दाखल आहेत. आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात येणार. २५ वर्ष आमच्या सोबत शिवसेना होती परंतु या ठिकाणी त्यांच्यामधील लोक येत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे येतील कारण ते ही जुने स्वंयसेवक आहेत.