जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‌ आषाढी यात्रेच्या तयारीची केली पाहणी

प्रतिनिधी, पंढपुर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर येथे येऊन आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली.यात्रेच्या तयारीची पाहणी करणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. येत्या 29 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत.- येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग स्वच्छता पाणी आरोग्य आधी सुविधा प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत सर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतला. पत्रा शेड दर्शन रांग वाखरी पालखी तळ महा आरोग्य शिबिराच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा जाणून घेतला यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.