जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून दिली कम्युनिस्ट पार्टीचे जेष्ठ आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांना भेट

प्रतिनिधी, सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील दिव्यांग बांधव सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी कॉम्रेड महिला बिडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अंतर्गत रस्ते व मूलभूत समस्यांबाबत चे निवेदन 11 प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक वेंकटेश कुमारी, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, फातिमा बेग, तौफिक शेख शकुंतला पाणीभाते महीबुब शेख इब्राहीम मुल्ला अमीना शेख किशोर घायतोडे आदींचा समावेश होता.