प्रतिनिधी, नंदुरबार : महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीला शिवसेना जबाबदार असून यात भाजपाच्या काही संबंध नसल्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी आज नंदुरबार येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .जनतेला जनतेत फिरणारा नेता पाहिजे घरा बसून भाषण देणारा नाही ,जनता महाविकास आघाडीला सरकारला कंटाळली होती. आता जवळपास शिवसेनेतील 75 ते 80 टक्के शिवसैनिक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.जिल्हा परिषद, नगरपालिका ,नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य असे सर्व आता शिंदे गटाकडे वळत आहेत. लोकांना जमिनीवर चालणारा नेता पाहिजे हुकूमशाही राजकारण करणारा नको. शिवसेनेला आता मुंबई महानगरपालिकेच्या पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ते भाजपावर आरोप लावत आहेत परंतु भाजपच्या याच्याशी काडीमात्र संबंध नसून महाराष्ट्रात जे काही घडले आहे ते शिवसेने मुळेच असे मत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी मांडले.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढा आणि किती लोक जिंकुन येतात ते बघा. आपलं अस्तित्व काय आहे हे आपल्याला कळेल. राजकारण घरी बसुन करु शकतं नाही. नुसते टिव्ही समोर बसाल आणि भाषण द्याल त्यात लोकांना रस राहिलेला नाही आहे. लोकांना आता फिल्ड वरचा नेता पाहिजे. त्यांचे सुख-दु:ख जाणुन घेणारा नेता पाहिजे आहे. म्हणुन लोक शिवसेनेला कंटाळले आहेत. आपले अपयश लपविण्यासाठी भाजपाला दोषी ठरवत आहेत.
