प्रतिनिधी , मुंबई : मुंबई या मायानगरीचं नाव जरी घेतलं तरीदेखील अनेक गोष्टी धडाधड डोळ्यासमोर उभ्या राहतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव. मुंबई आणि मुंबईचा वडापाव या दोघांचं नात काही औरच आहे. केवळ मुंबईकरच नव्हे तर या वडापावची भूरळ पार विदेशी नागरिकांनादेखील आहे. त्यामुळे विदेशातदेखील वडापावची तुफान क्रेझ पाहायला मिळते. बटाट्याची भाजी आणि बेसन पीठापासून तयार केलेल्या पारंपरिक वडापावची जागा आता वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवरच्या वडापावने घेतली आहे. त्यामुळे चीझ वडापाव, ग्रील वडापाव, जम्बो वडापाव असे अनेक वडापावचे प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.दादरमधील अशोक वैद्य यांनी पहिला वडापाव तयार केला आणि पाहता पाहता त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली. १९६६ मध्ये अशोक वैद्य यांनी त्यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर वडापाव ही नवीन डिश तयार केली असं म्हटलं जातं. याच कुटुंबीयांनी त्यानंतर हा पारंपारिक व्यवसाय म्हणून 1966 पासून ते आतापर्यंत करत आहे या परिवारातील तिसरी पिढी वडापावचा व्यवसाय करत आहे. यात अनिल वैद्य यांनी वडापावचा व्यवसाय सुरु केल्याचं म्हटलं जातं.
धकाधकीच्या जीवनात अशोक वैद्य यांनी अनेक जणांना धावपळ करताना पाहिलं होतं. मात्र, वेळ आणि पैशाच्या अभावामुळे पोटात भूक असतानादेखील या चाकरमान्यांना पुरेसं जेवण मिळत नव्हतं. त्यामुळेच कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि वडापावचा शोध लागला.वडापाव आधारित आहे डॉक्युमेंट्री अशोक वैद्य यांच्या वडापावच्या कथेवर एक डॉक्युमेंट्रीदेखील तयार करण्यात आली आहे. २०१५ मध्ये एका पत्रकाराने यावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार केल्याचं म्हटलं जातं.
