प्रतिनिधी, जळगाव : राज्यात परतीचा पावसामुळे व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे दिवाळी अंधारातच गेले आहे परंतु शासनामार्फत शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाही आहे. शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी राज्याला मिळालेले कृषी मंत्री यांना काळी मातीची जाण नसलेल्या व शेतकऱ्यांच्या संवेदना व भावना कळत नसलेला व्यक्तीला कृषी मंत्री बनवलेला आहे. जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दारू पिता का असे विचारत असतील तर हे चुकीच आहे त्यांच्या राजीनामाच्या मागणी करता आहे ते योग्य आहे महाराष्ट्राचे सरकारने महाराष्ट्राचे विकासाकडे लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्र राज्यातून मोठ-मोठे उद्योग प्रकल्प गुजरात मध्ये जात आहेत तर महाराष्ट्राने काय करावं महाराष्ट्रातील तरुणांनी काय करावे सरकारने लक्षात घ्यावं तरुण एकदा पेटला ठिणगी पडली तर सरकारला तो वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.
