जनतेज न्युज

नाशिकमध्ये पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावटी नोटा जप्त; आरोपी अटकेत

प्रतिनिधी , नाशिक : नाशिकमध्ये तब्बल पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत पोलिसांनी मोठी कारवाई केली. ५०० आणि दोन हजार रुपयांच्या ५ लाख ८ हजार किंमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केलीय. मलायारसन मदसमय असे या अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, ही व्यक्ती मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. या व्यक्तीवर भारतीय चलनी नोटा नकली तयार करणे आणि त्या नोटा खरे चलन म्हणून वापरणे याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री भारतनगर परिसरातून पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक केली.