प्रतिनिधी , नाशिक : विविध मागण्यांसाठी आज सिटी लिंक बस चालक आणि वाहकांकडून संप पुकारण्यात आला होता,मात्र सिटी लिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बस डेपो मध्ये येऊन आश्वासन दिल्या नंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.सकाळपासून बंद असलेली शहर बस सेवा वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.दुपारी 2 वाजता कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्याचं आश्वासन या वेळी बस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. येत्या तीन-चार दिवसात कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्याचे देखील अधिकाऱ्यांनी आश्वासन यावेळी दिले.सिटी लिंक बस सेवा प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू होत डेपोतून बस बाहेर रस्त्यावर धावल्या आहे.तर आज दुपारी होणाऱ्या बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून असणार आहे.अचानक सकाळपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांचे हाल झाले होते मात्र आता ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे..
