प्रतिनिधी , सातारा : प्रभू येशू ख्रिस्तजन्मानिमित्त साजरा होत असलेल्या पवित्र नाताळ सणासाठी सातारा नागरी सज्ज झाली असून साताऱ्यातील 167 वर्ष जूने असलेल्या टिळक मेमुरियाल चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर सातारच्या बाजारपेठेतील दुकाने नाताळ सणासाठी लागणारे साहित्यांनी गजबजून गेली आहेत. ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवासाठी सातारच्या ख्रिस्ती बांधवांनी 167 वर्ष जुने असलेल्या टिळक मेमुरियाल चर्चाच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 20 डिसेंबर पासूनच ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जात असून या माध्यमातून कॅरल सिंगिंग,ख्रिस्त जन्मोत्सव रॅली,ख्रिस्ती गीतांचा कार्यक्रम तसेच कँडल लाईट मार्च अश्या विविध कार्यक्रमांनी हा नाताळ सण साजरा होत आहे . साताऱ्यातील ऐतिहासिक अशा 167 वर्ष जुन्या टिळक मेमोरियल चर्चला ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून या परिसरामध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाचे विविध फलक आणि चित्र लावण्यात आली आहेत तर ख्रिस्ती बांधवांना आपल्या घरामध्ये नाताळ सणाची सजावट करतायावी यासाठी साताऱ्यातील बाजारपेठेमध्ये विविध विद्युत रोषणाईची तोरणे,क्रिसमस ट्री ,सांताक्लॉज टोपी, सांताक्लॉज स्टॅच्यू तसेच विविध रंगबिरंगी तोरणांनी दुकाने सजली आहेत.
