जनतेज न्युज

पुर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी संस्कृती कला क्रिडा महोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी , ठाणे : लोकमान्यनगर- शास्त्रीनगर विभाग व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी “संस्कृती कला क्रिडा महोत्सवाचे आयोजन २४ डिसेंबर २०२२ ते २७ डिसेंबर २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. संस्कृती कला क्रिडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यामध्ये बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फैन्सी ड्रेस, मिस व मिसेस लोकमान्यनगर व होम मिनिस्टर या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या महोत्सवात लहान मुलांपासून, महिला, पुरूष ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होत असतात दरवर्षी अंदाजे अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होत असतात. स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपली कला जोपासावी या मुळ उद्देशाने पुर्वेश सरनाईक यांनी या कला क्रिडा महोत्सवास सुरूवात केली होती या महोत्सवाचे उदघाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेना सचिव पूर्वेस सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेविका आशाताई डोंगरे, संदीप डोंगरे, सर्व कार्यकर्ते उपस्तीत होते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाअंतीम सोहळा, बक्षिस समारंभ व महिलांसाठी “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” ह्या विशेष स्पर्धेचे घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी लकी ड्रा चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये फ्रिज, सायकल, वॉशिंग मशीन, फूड प्रोसेसर, स्मार्ट टीव्ही, गॅस स्टोव्ह, मायक्रोवेव्ह व्हॅक्युम क्लिनर, वॉटर प्युरिफायर, साऊंड बार, प्रिंटर अशी बक्षिसे लकी ड्रॉ विजेत्यांना देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.