जनतेज न्युज

नवी मुंबई ऐरोलीत शिंदे गटाची हिंदुगर्वगर्जना संपर्क यात्रेचा पहिला मेळावा संपन्न

प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबई ऐरोली येथील लेवा पाटीदार हॉलमध्ये शिंदे गटाच्या हिंदुगर्वगर्जना संपर्क यात्रेचा पहिला मेळावा संपन्न झाला. नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आयोजित या संपर्क यात्रा मेळाव्याला प्रमुख मागर्दशन करत असताना महाराष्ट्राचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत बाळासाहेब ठाकरे हे केवळ तुमचे वडील नव्हते तर ते आम्हा सगळ्या शिवसैनिकांचे आणि महाराष्ट्राचे बाप होते असे ठणकावले. माझ्या बापाचा फोटो काढून मग राजकारण करा या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे बाप आहेत, त्यांचा फोटो हटवून जनतेमध्ये जा जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भाषणा दरम्यान भुसे यांनी अनेक लोकोपयोगी कामांचा उल्लेख करत एकनाथ शिंदें सारखा व्यक्ती मुख्यमंत्री मिळाणे महाराष्ट्रासाठी उज्वल भविष्याची नांदी असल्याचे म्हटले. ऐरोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारले जाणार असल्याचेही भुसे म्हणाले. यानंतर भुसे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.