जनतेज न्युज

रेशन धान्य दुकानातील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

प्रतिनिधी, औरंगाबाद : सिल्लो ड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शासन निर्णय प्रमाणे भावफळक, स्टॉक रजिस्टर, तक्रार नोदवही दुकानात उपब्धत न ठेवणे, ई पोस मशिनी द्वारे पावती न देता कमी धान्य देणे. अत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी ची यादी दुकानात न लावणे तसेच गरिब कल्याण अन्न योजनेतून पात्र कुटुंबांना मोफत धान्य वाटप न करणे आदी विषयाची तत्काळ चौकशी करण्याच्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नागरिक उपस्थित होते.