प्रतिनिधी , जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील टोळी येथे निंबाच्या झाडावर विज पडल्याने अशाप्रकारे झाड पेटले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील टोळी गावानजीक काल शनिवारी दुपारी निंबाच्या झाडावर विज कोसळली आणि लागलीच झाडाने पेट घेतला. हलक्या सरी बरसत असताना पेट घेतल्याचे दिसताच ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र विज कोसळल्यामुळे झाडाचे दोन भाग विभागले गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे हि आग आतुन बुंद्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. झाड केव्हाही कोसळेल या भितीने ग्रामस्थ सावध झाले आणि या रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहनधारकांनाही सुचना देत गेलो. रात्री उशिरापर्यंत अगीची धग सुरुच होती.
