प्रतिनिधी , अमरावती : दरवर्षी प्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पार्टी द्वारा अमरावतीत भव्य रक्षा बंधन कार्यक्रम आज आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील मुख्य कार्यालयावर हजारो महिलांनी राखी बांधून साजरा केला,यावेळी आमदार रवी राणा यांना जिल्ह्यातील शेकडो महिलांनी राख्या बांधल्या,यावेळी रवी राणा यांना मंत्री पद मिळालं नसल्याने महिला नाराज झाल्या यावर रवी राणा यांनी बोलतांना सांगितले की,निराश होण्याच कारण नाही अर्ध मंत्री मंडळ झालं अर्ध बाकी आहे,मी १०वर्षा पासून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे तर मी मंत्री पदाची मागणी केली नाही पण अमरावती जिल्ह्याला देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे न्यात देतील अशी अपेक्षा रवी राणा यांनी व्यक्त केली तर यावेळी हजारो महिलांना तिरंगा झेंड्यांचे वाटप ही करण्यात आले.
