प्रतिनिधी, अमरावती : यावर्षी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. हाती आलेलं कपाशी आणि सोयाबीन, तूर पिकाचं मोठं नुकसान झाल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत म्हणून मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती. दरम्यान प्रशासकीय दिरंगाई मुळे दिवाळी तोंडावर असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते मात्र आता हालचाली सुरू झाल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिवाळीपूर्वी जमा व्हावे व शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी बँका मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. अमरावती शहरातील अनेक बँका या वेळेनंतरही रात्री कामकाज करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत अमरावती शहरातील अनेक बँका काम करत आहे जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई चे पैसे टाकल्याचा दावाही बँकांनी केला आहे.
