जनतेज न्युज

न्यायव्यवस्थेच्या निर्णयामुळे अविश्वास दाखवणा-या लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल अशी अपेक्षा – सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी, चंद्रपूर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दिली. यावर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत, आतातरी न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास बसेल. न्यायव्यवस्थेच्या निर्णयामुळे अविश्वास दाखवणा-या लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल अशी अपेक्षा.असे मत व्यक्त केले. नेहमीच न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे लोक या निर्णयामुळे तरी न्यायालयावर विश्वास दाखवतील, अशी अपेक्षा करूया, असेही ते म्हणाले.