जनतेज न्युज

पाचोरा तालुक्यात अनेक पदे रिक्त असतांनाही लम्पी चे शंभर टक्के लसीकरण

प्रतिनिधी, जळगाव : पाचोरा तालुक्यात लंम्पी आजार दिवसेंदिवस पाय पसरुन लागला असून मोठ्या प्रमाणात गुरांना लंम्पी सदृश आजाराचे लक्षणे आढळून आली आहेत. पाचोरा तालुक्यात आतापर्यंत 88 गुरांना लंम्पी आजाराची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत तालुक्यातील साहा पशुधन दगावले आहेत. पाचोरा तालुक्यात पशुधन विकास अधिकारी यांची मंजुर पदे 8 इतकी असतांनाही फक्त 3 पदेच भरण्यात आली आहे.पशुधन पर्यवेक्षक यांची पाचोरा तालुक्यात 10 पदे मंजूर असतांनाही फक्त 6 पदे भरण्यात आली आहेत.व परिचर ची 19 पदे मंजूर असतांनाही फक्त 9 पदे भरण्यात आली आहे.अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कर्मचारी संख्येअभावी गुरांचे लसीकरण करण्यासाठी पशुधन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.असे असतांनाही मात्र पाचोरा तालुक्यात आज लम्पी चे शंभर टक्के गुरांचे लसीकरण पुर्ण करण्यात पशुसंवर्धन विभाग पाचोरा हे यशस्वी झाले असल्याचे तालुका पशुधन विकास डॉ. सुजाता सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.