प्रतिनिधी, यवतमाळ : उमरखेड शहरातील प्रमुख रस्ते असलेल्या सर्व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जवाबदारी ढकलत आहेत. थातुरमातुर दुरुस्तीची पोलखोल पहिल्या पावसाने केली असून शहर खड्डेमय झाले आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक यांना बसत आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना कुठल्याही संवेदना उरलेल्या नसल्याची नागरिक ओरड करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.
