प्रतिनिधी , नवी मुंबई : मोरा प्रवाशी धक्का व जेएनपीटी शेवा दरम्यानच्या मासेमारी जमिनीत NMSEZ ने प्रवाशी व इतर धक्के बांधण्याची योजना आखली होती. त्या मासेमारी जमिनीचे भुईभाडे JNPT ला देण्याचा करार झाला होता. त्यावेळी पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीने मासेमारी जमिनीचा मोबदला जेएनपीटी प्रशासनाकडे मागितला होता. मात्र मच्छीमारांना मोबदला देण्यास जेएनपीटी ने नकार देत त्यांचे पुनर्वसन देखील करण्यास विरोध दर्शवला होता. 2005 सालापासून मच्छिमार बांधव आपल्या मागण्यासाठी लढा देत होते. अखेर पारंपारिक मच्छिमारांच्या लढ्याला यश आले असून सर्वोच्च न्यायालयाने मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जेएनपीटी प्रशासनाला दिलेत. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती तर्फे मच्छीमारांचा विजयी मेळावा घेण्यात आला.
