जनतेज न्युज

येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी आवश्यक आहे ते काम करायला पाहिजे – मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी , सिंधुदुर्गा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्यात पालकमंत्री म्हणून आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयाचा आढावा घेण्यासाठी ओरोस येथील जिल्हा नियोजन सभागृहात अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याची माहिती घेतली. मात्र देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी पर्यटनाबाबत आढावा मांडला नसल्याची खंत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. यापुढच्या काळात अधिकाऱ्यांनी वेळच्या वेळी काम केली पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा सज्जड दमही दिला. भाजप नेते निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनचा विकास निधी मोठा असावा, जेणेकरुन जिल्हयाचा विकास करता येईल. जिल्ह्याचा विकास निधी आता २०० कोटी सुध्दा नाही, मी खासदार असतांना मोठा होता. आता तो २५० कोटी असावा अशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. जिल्ह्यातील नियोजनचे अधिकारी निधी वाटप करताना कणकवली मतदारसंघाला डावलतात. यापुढे असं होता नये यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आपल्या मतदारसंघात अन्याय होता नये अशी आशा व्यक्त केली.