प्रतिनिधी, मुंबई : पवई जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर पवई सुवर्ण मंदिर जवळ अचानक रस्ता खचल्याने वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. यामुळे विक्रोळी वरुण अंधेरी कडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी इथे पालिकेने काम केले होते. मात्र त्यावर निकृष्ट दर्जाच रस्ता बनवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अचानक रस्ता खचल्याने जेवीएलआर वर वाहतूक कोंडी झाली असून पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले आहे. रस्ता दुरूस्ती चे काम हाती घेण्यात आले आहे.
