जनतेज न्युज

पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील रस्ता जलमय

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : गेले तीन दिवसा पासून कल्याण डोंबिवलीत परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आज दुपार नंतर चांगलाच जोर धरला असून गेल्या अर्धा तास पूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण कोळसेवाडी आडीवली-ढोकळी परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला असून पर्याय व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना याच रस्त्यातून मार्ग काढून वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पाऊस विश्रांती घेत असल्याने हळूहळू रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, पाण्याचा जोर वाढला तर कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.