प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : दोन वर्षानंतर सर्वत्र दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे.सर्वत्र बाजारपेठा नागरिक भरून गेल्याल्या दिसत आहेत.तसेच दिवाळी म्हंटली की डोंबिवली फडके रोडवर तरुणांची गर्दी हे समीकरण आहेत.यातच आता दिवाळी निमित्ताने मनसे आमदार राजू पाटील यांच्या तर्फे डोंबिवली मधील प्रसिध्द असलेल्या फडके रोडवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.ही रोषणाई पाहण्यासाठी, सेल्फी, व्हीडिओ, रील आणि फोटो काढण्यासाठी नागरिकांची गर्दी केली आहे.पुढचे काही दिवस फडके रोडवर विद्युत रोषणाई असेल मनसे तर्फे सांगण्यात आले.
