प्रतिनिधी , सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी वर मोहोळ तहसीलदार यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी प्रहार संघटना आक्रमक झाली असून तात्काळ गुन्हा मागे घ्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
मोहोळ तहसीलदार कार्यालयात होणारा भ्रष्टाचार, बेकायदेशीर कामे, खडी उत्खनन , वाळू तस्करी हे रोखण्याचे काम मोहोळ येथील प्रहार चे पदाधिकारी करत होते. याची सूचना शहराच्या पदाधिकाऱ्यांना दिली जात होती. आपलं पितळ उघड होईल या भीतीने मोहोळ तहसीलदार बेडसे यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मत व्यक्त करत पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले आहे.
