प्रतिनिधी , अहमदनगर : आधुनेकतेची कास धरत संगमनेरच्या मुळाखोऱ्यातील घारगाव येथील युवा शेतकऱ्याने उन्हाळ्यात येनार खरबुज पिक क्रॉप पेपर वापरत हिवाळ्यात पिकवले आहे.आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्याने पारंपारीक शेतीला फाटा देत क्रॉप पेपर चा वापर करत खरबुज या वेलवर्गीय पिकाची हिवाळ्यात लागवड केली असुन ती यशस्वी करून अनोख्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याने वातावरणावर मात केली आहे. खरतर खरबुज हे पिक उन्हाळ्यात येनारे पिक मानले जाते मात्र हे पिक हिवाळ्यात देखील आपन घेऊ शकतो हे दाखवुन दिले आहे तंत्रज्ञानाच्या दिशेने पुढचं पाऊल टाकत अनोखा उपक्रम करत संगमनेरच्या 28 वर्षीय युवा शेतकरी किरन धात्रक यांनी धात्रक यांनी हा प्रयोग अर्धा ऐकरवर घेऊन यशस्वी केला आहे.अगोदर त्यांनी बेड पाडुन ठीबक सिंचन करून मल्चिंक पेपर वर खरबुजाची लागवड करत त्यावर क्रॉप पेपरचे नियोजन केले आहे. या मुळे पिकाचे थंडी पासून संरक्षण होते,कीटकनशकांचा वापर करावा लागत नाही,पीक रोगाला बळी पडत नाही,फवारणीचा खर्च वाचतो, खुरपनी करावी लागत नाही,ऑरगॅनिक पद्धतीने फळ पिकवता येतातात आणि अर्थातच शेतीच्या खर्चात बचत होते.धत्रक यांना कॉप कव्हर साठी 7 ते 8 हजारांचा खर्च आला आहे.तर त्यांना आत्ता पर्यत ऐकुन खर्च 50 हजार ईतका आला आहे.आता गट शेती मार्फत आम्ही 10 एकर क्षेत्रावर क्रॉप कव्हरच्या माध्यमातुन कलिंगड पिकाची लागवडीचे नियोजन करनार असल्याचे धात्रक यांनी सांगितल आहे.
