प्रतिनिधी , नागपूर : आई आपली मार्गदर्शक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना घडवताना, त्यांच्यामध्ये संस्कार देताना हीराबेन ह्यांचा मोठा वाटा आहे. देशाला हा अनमोल हिरा हा हिराबेन ह्यांनी दिला आणि शंभर वर्ष पूर्ण करून त्या ईश्वराच्या चरणी लीन झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी स्वतः आईला खांदा देत आईच आणि मुलाच काय नात असत ते दाखवून दिल. मी माझ्या वतीने व पक्षाच्या वतीने हिराबेन ह्यांना आदरांजली व्यक्त करतो.
