प्रतिनिधी, बुलडाणा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणप्रेमींनी आज सकाळी बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हिरवी झेंडी दाखविली, स्थानिक गांधी भवन येथून या पर्यावरण सायकल रॅली ची सुरवात करण्यात आली. सदर रॅलीने शहराच्या मुख्य चौकातून मार्गक्रमण केली, या पर्यावरण सायकल रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांना पर्यावरण संरक्षणाचा घेऊ संकल्प असा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये असंख्य अधिकारी,पर्यावरण प्रेमीं आणि बुलढाणा शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
