प्रतिनिधी, सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पापरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे ऐन काढणीला आलेली अडीच एकर केळी बाग जमीनदोस्त झाली आहे. राजेंद्र शेळके यांची अडीज एकरातील केळी बागेच सौदा ही झाला होता, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जवळपास 70 टन केळी मातीमोल झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
