जनतेज न्युज

प्रत्येकाने काळजी घेऊया आणि कोरोनाला दूर ठेवूया – आदेश बांदेकर

प्रतिनिधी , मुंबई : प्रत्येक व्यक्तीने आपली आणि त्याच बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी पर्यायाने राज्याची आणि देशाची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेणे फार गरजेचे आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या वतीने मंदिरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे हेल्थ चेकअप करण्यात आले आहे. प्रत्येकाने काळजी घेऊया आणि कोरोनाला दूर ठेवूया, असे सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे.