प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची लागवड केली आहे. या वर्षी हरभरा पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या हरभरा पिकांवर मग रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पिकांवर फवारणी होऊन देखील रोगाचा परिणाम होताना दिसुन येत आहे. मर रोगामुळे पिकांचे उत्पन्न आणि त्या पिकांना भाव योग्य दरात मिळणं कठीण झाले आहे. आधी तुरीच्या पिकांची शेती केली परंतु शेती नदीच्या जवळ असल्याने वाहुन गेलं त्यानंतर हरभरा पेरण्याचा विचार केला. हरभरा पिकाची शेती सुरु केल्यानंतर लगेच त्यावर मर रोग सुरु झाला. ज्या अपेक्षेने हरभरा पिकाच्या शेतीला सुरुवात केली होती त्या अपेक्षेवर मर रोगाचे सावट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. शेतकऱ्यांना हरभरा पिकाला जास्तीत जास्त भाव प्रशासनाने जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
