जनतेज न्युज

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये युवकांसाठी करिअर कौन्सिलींग, रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, आयटीआय, 12 वी व्होकेशनल पास विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटीसशीपच्या संधी तसेच इ. १० वी, १२ वी, पदविका व पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री यांच्या स्किल इंडिया मोहीमेद्वारे राज्यातील प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यामार्फत रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. असे अर्थमंत्री भागवत कराड म्हणाले. या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, संचालक दिगंबर दळवी यांच्यासह विविध उद्योजक, आदी उपस्थित होते नवउद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी त्यांचे स्टार्टअपचे प्रदर्शन व सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली आहे. नाविन्यता विषयक विविध संकल्पनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध रोजगाराच्या संधी देण्यासाठी किमान १०० नामांकित औद्योगिक आस्थापना उपस्थित होत्या. युवक युवतींनी कौशल्य विकास आणि त्याचबरोबर रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. आयटीआयच्या मुलांनी या ठिकाणी आले आहेत दहा हजार मुले या ठिकाणी आलेले आहे आणि आणखी येणार आहे आमची अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राचे लक्ष आहे. यावेळी अमृत महोत्सवात पाच हजार पाच लाख लोकांना रोजगार मिळेल त्याचीही सुरुवात आहे. या मेळाव्यामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळतील असे मंगल प्रभात लोढा म्हणाले. शहरात असुनही मुख्यमंत्री यांच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपण आले नाही यावर ते म्हणाले की सर्व मंत्री आपपाल्या भागात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहे. मीही दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर होतो असे यावेळी म्हणाले.