प्रतिनिधी, दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे निवृत्त होत असल्यानं ही सुनावणी 5 आठवडे पुढं ढकलण्याचा निर्णय दिला आहे. या संदर्भात आज राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बातचीत केली.किमान 5 आठवडे प्रभागरचना करता येणार नाहीराज्यसरकारला 4 प्रभागाचा एक प्रभाग करायचा होता.निवडणूका पुढं ढकलल्या आहेत.हा सगळ्या खेळखंडोबा सुरू आहे.काही महापालिकांची निवडणूकांची मुदत संपूण वर्ष झालं आहे.प्रशासक 1 वर्षापासून कारभार करत आहे.प्रशासकचं जर कारभार पाहत असेल तर निवडणूका कशाला?
राजू शेट्टी यांचा सवाल. राखीव जागा ओबीसी समाजाचा अधिकार. ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात बऱ्याचदा असं वाटतं आता निकाल जनतेच्या बाजून लागेल. सरकारवर ताशेरे मारले जातात. आणि नंतर निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो.
