जनतेज न्युज

राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी पोहोचविणे काळाची गरज ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाची सुरुवात

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन शहरातील अभियंता भवन येथे सुरू झाले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ही कर्मयाेगी संत गाडगेबाबा यांच्या समाधिस्थळाचे पूजन करून ग्रंथदिडीने करण्यात आली. राष्ट्रसंतांचे विचार हा मानवतेचा विचार आहे. त्यामुळे हे विचार प्रत्येक घरोघरी पोहोचविणे ही काळाजी गरज असल्याचा सूर या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सर्व मान्यवरांच्या भाषणातून उमटला.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्ह्याच्या वतीने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अमरावती अभियंता भवन येथे आयोजित केले आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या उपस्थितीत डॉ. सुभाष सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे हे होते.  आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनाची गरज प्रत्येक शहराला आणि जिल्ह्याला असल्याचे प्रतिपादन केले.  समाधिस्थळाला अभिवादन करून अभियंता भवन येथे राष्ट्रसंतांच्या गजरात दिंडी पोहोचली. त्याचबरोबर सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन संगीत मैफिलीचा कार्यक्रम, कविसंमेलन हेही या साहित्य संमेलनात पडले पार