जनतेज न्युज

रेल्वे दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना कॅन्डल लावून काँग्रेसतर्फे दिली श्रद्धांजली

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सर्व काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्यातर्फे ओडीसा मध्ये रेल्वेच्या भीषण अपघात झाला त्या अपघातात मध्ये 288 जण मृत्यू पावले त्याचबरोबर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जे मृत्यू पावले त्यांना श्रद्धांजली वाहाली. जे जखमी झालेत त्यांना  लवकरात लवकर बरे क्षकरण्यासाठी प्रार्थनाक्ष करण्यासाठी ही श्रद्धांजली वाहत आहे.मृत पावलेल्या प्रवाशांना दहा लाख व जखमींना पाच लाख रुपये द्यावे रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. एक नैतिक जबाबदारी म्हणून लाल बहादूर शास्त्री असतील मधु दंडवले असतील जाॅर्ज फर्नांडिस असेल ममता बॅनर्जी असतील यांनी आतापर्यंत रेल्वेमंत्री असताना कायमस्वरूपी राजीनामे दिले आणि आता रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यांची मागणी आम्ही करतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी माजी आमदार कल्याण काळे यांनी केली.