जनतेज न्युज

उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सामंत समर्थक आक्रमक

प्रतिनिधी, रत्नागिरी : आमदार उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद हे आता रत्नागिरी देखील पाहायला मिळत आहेत. सामंत समर्थक हे आक्रमक पवित्र्यात असून, पुण्यात जो उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी उदय सामंत समर्थकांनी केली आहे.तसेच हातात फलक घेऊन सामंत यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. सामंत समर्थकांनी सकाळी बॅनरद्वारे हल्ल्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता सामंत समर्थक उदय सामंत यांच्या कार्यालयात जमले.असून त्यांनी घोषणा देत या हल्ल्याचा निषेध केला तसेच उदय सामंत हे संयमी असतील पण आम्ही नाही जशासतसे उत्तर देऊ असे देखील ते म्हणाले.