जनतेज न्युज

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी, सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा 25 वा वर्धापन दिन महापालिका मुख्यालयामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी , महापालिका आयुक्त सुनील पवार , विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत केक कापून महापालिकेचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे सभागृह नेत्या भारती दिगडे , उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील , नगरसेवक उत्तम साखळकर, जगन्नाथ ठोकळे, करन जामदार, तौफिक शिकलगार, लक्ष्मण नवलाई, सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, यांच्यासह महापालिकेचे नगरसचिव चंद्रकांत आडके , वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, शहर अभियंता परमेश्वर अलकुडे , आरोग्यधिकारी रवींद्र ताटे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, सहदेव कावडे, सावता खरात, अशोक कुंभार, गिरीश पाठक यांच्यासह मनपाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा 25 वा  वर्धापन दिनानिमित्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात चार नवीन फायर फायटरसह पहिली इलेक्ट्रिक गाडी दाखल झाली आहे. या नव्या वाहनाचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते  लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने पर्यावरण पूरक पाऊल उचलत माजी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आणि एनकॅपच्या माध्यमातून पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी करीत पर्यावरण आणि वसुंधरा रक्षणाचा संदेश देण्यात आला. महापालिकेने 25 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत शासन आणि महापालिका निधीतून चार फायर फायटर, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दोन जेटिंग रॉडिंग ग्राबिंग वाहने व चार ट्रॅक्टर , नगर रचना विभागासाठी एक कार आणि एन कॅप मधून प्रायोगिक तत्वावर पहिली इलेक्ट्रिक कार अशी एकूण 3 कोटी 10 लाखाची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. या नव्या वाहनाचे स्टेशन चौकात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, सभागृह नेत्या भारती दिगडे, उपआयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे,अनारकली कुरणे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुबराव मद्रासी, विनायक सिंहासने, उत्तम साखळकर, संतोष पाटील, करन जामदार, लक्ष्मण  नवलाई, संजय यमगर, तोफिक शिकलगार, जमीर कुरणे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव , सहायक आयुक्त सहदेव कावडे, सावता खरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.