जनतेज न्युज

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्यांची तस्करी

प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका हा अवैद्य गुटखा आगार बनत चालंल आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा किंग व गुटख्याची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुनील इंघे यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देत गुटख्या विषयी आवाज उठवला याची दखल घेतात संगमनेर तालुक्यात अहमदनगरचे अन्न व भेसळ प्रशासनाचे अधिकारी पवार यांनी धाडमारत कारवाई केली. यामध्ये मोठे गुटखा किंग सोडून सर्वसामान्य टपरीधारकांवर कारवाई करत मोठी कामगिरी केल्याचा बनाव व प्रशासनाने केला आहे. या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांनी तीव्रशब्दात नाराजी व निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, मी संगणमेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायत ठराव घेऊन तसेच ऑनलाइन तक्रार करून ही कारवाई केली आहे. या गुटखा किंग मुळे आमच्या भागातील तरुण मुलं गुटख्याच्या आहारी जाऊन त्यांच्या आयुष्य बरबाद करायचा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मी वेळोवेळी पाठपुरावा केला या कारवाईची दखल घेत अन्न प्रशासनाने केवळ नाम मात्र सर्वसामान्य अशा टपरीधारकांवर कारवाई करत फार मोठी कामगिरी केल्याची बातुलकी केली आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरला मी अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालय समोर येईल महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मुख्य गुटखा किंग मेकर पकडत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे असा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांनी केला आहे.